शंखी गोगलगायीचे नियंत्रण व नियोजन कसे करावे? जाणून घ्या पूर्ण माहिती ! Conch Snail Control 2024


Conch Snail Control 2024 :- भाजीपाला आदी पिकांवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत.

असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या गोगलगायींना वेळीच ओळखून नियंत्रण केल्यास शेतकरी पिकांच्या नुकसानीपासून वाचू शकतील.

बहुतांश शंखी गर्द, करड्या, फिकट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. ही कीड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने खाऊन छिद्र पाडते;

📢 हे पण वाचा :- आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर याप्रमाणे लिंक करा, नवीन मार्ग 2024 !

तसेच नवीन रोपे, कोंब, भाजीपालावर्गीय पिके, फळे, फुले तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यांवर उपजीविका करते. 

रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावित शेतातील शंखी गोगलगायी व त्यांना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.

Conch Snail Control 2024

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. जमिनीची खोल नांगरट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावी, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत; जेणेकरून गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते .

त्याखाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करून उकळत्या पाण्यात किवा साबणाच्या द्रावणात वा केरोसीनमिश्रित पाण्यात टाकून माराव्यात किंवा खोल खड्यात पुरून वरून चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा.

पोती भिजवून शेतात टाकावीत

📢 हे पण वाचा :-पीएम मुद्रा कर्ज योजना 2024: 10 लाखांच्या कर्जावर 35% सबसिडी मिळेल, संपूर्ण माहिती पहा !

गुळाच्या द्रावणात एक किलो गूळ प्रती १० लिटर पाणी गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळेस शेतात पिकाच्या ओळींत पसरून द्यावीत.

लहान गोगलगाईच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी. शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतील बाजूने तंबाखू किंवा चुन्याचा ४ ते ५ इंच पट्टा टाकल्यास गोगलगायींना अटकाव होतो.

Leave a Comment