खुशखबर या भागामध्ये मंदावला मान्सून इथं मात्र जोरदार हजेरी वाचा डिटेल संपूर्ण ! Maharashtra Rain Update Today

Maharashtra Rain Update Today :- हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. परिणामी पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. २० जूननंतरच पावसाचा जोर वाढेल, 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली.

सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील अमरावती, चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील जळगावपर्यंत झाला आहे. मात्र, हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नल्याने वाऱ्यांचा वेग मंदावला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजनुसार, पुढील ५ दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडू शकतो.

20 जूननंतरच राज्यात पावसाचा जोर वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत ६ इंच खोलवर ओल गेल्याशिवाय बियाणे रोवू नये, 

दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. मुंबईतही दोन दिवस आधीच मौसमी वाऱ्यांचं आगमन झालं.

📢 हे पण वाचा :- आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर याप्रमाणे लिंक करा, नवीन मार्ग 2024 !

Maharashtra Rain Update

मान्सूनचे आगमन होताच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोकण, सिंधुदुर्गात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. 

मुंबईसह उपनगर आणि पुणे जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होऊ शकतो. ठाणे, पालघर, रायगड या भागात,

मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.

आज दक्षिण कोकणातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. 

📢 हे पण वाचा :-पीएम मुद्रा कर्ज योजना 2024: 10 लाखांच्या कर्जावर 35% सबसिडी मिळेल, संपूर्ण माहिती पहा !

Leave a Comment