Home » इलेक्ट्रिक वाहन » Top 5 CNG Cars Under 6 Lakh | शानदार मायलेजच्या भारतातील Top 5 CNG कार, किंमत 6 लाखांपासून सुरू जाणून घ्या सविस्तर

Top 5 CNG Cars Under 6 Lakh | शानदार मायलेजच्या भारतातील Top 5 CNG कार, किंमत 6 लाखांपासून सुरू जाणून घ्या सविस्तर

Top 5 CNG Cars Under 6 Lakh :- देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे अनेकजण पेट्रोल आणि डिझेलवरील कारकडे पाठ फिरवत आहेत.

कारण सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलवरील कार वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. मात्र भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांची सीएनजी वाहने उपलब्ध झाली आहेत.

Top 5 CNG Cars Under 6 Lakh

तसेच काही कंपन्यांची सीएनजी वाहने किफायतशीर आहेत तर काही वाहनांच्या किमती अधिक आहेत.सध्या अनेक नागरिक इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार खरेदी करण्यास अधिक पसंती देत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये देखील सर्वाधिक रेंज असणाऱ्या कार अनेक कंपन्यांकडून सादर करण्यात आल्या आहेत. तसेच जबरदस्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कार देखील भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

Hyundai Aura CNG

देशातील ऑटो क्षेत्रातील कंपनी Hyundai Motor च्या देखील अनेक कार सीएनजीमध्ये उपलब्ध आहेत. Hyundai Motor ची सेडान कार Aura ही सीएनजी मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये कंपनीकडून 1.2-लिटर, 4-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 83 PS कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

तसेच Aura सीएनजी कार भारतातील सीएनजी मॉडेलमध्ये विकली जाणारी सर्वात स्वस्त कार आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.09 लाख रुपये आहे. तर एसएक्स व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.57 लाख रुपये आहे.

📑 हे पण वाचा :- पदवीधरांना IDBI बँकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदाच्या जागांसाठी भरती सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

Tata Tiago iCNG

सध्या भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्स कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय झाल्या आहेत. तसेच कंपनीकडून सीएनजी मॉडेलमध्ये Tiago iCNG कार सादर केली आहे. हे एक सर्वात स्वस्त सीएनजी कार म्हणून ओळखली जाते.

या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.30 लाख आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.82 लाख आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक जबरदस्त मायलेज देणारी सीएनजी कारचा पर्याय मिळत आहे. ही कार 26.49 kmpl मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

या कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिन देण्यात आले आहे. तर ही कार 86 PS कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्यामुळे जबरदस्त मायलेज देणारी कार ग्राहकांना कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे.

Maruti Suzuki Swift

मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय आहेत. तसेच देशातील सर्वाधिक कार विकणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. या कंपनीची स्विफ्ट कार देखील सीएनजीमध्ये उपलब्ध आहे.

तसेच सर्वाधिक विकली जाणारी मारुती सुझुकी स्विफ्ट ही एक हॅचबॅक कार आहे. सीएनजी मॉडेलमध्ये कंपनीकडून स्विफ्ट कारमध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर, ड्युअलजेट इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 89 PS कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी कार 30.90 kmpl मायलेज देते असा कंपनीकडून दावा करण्यात येत आहे. तसेच ही कार 7.7 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किमतीसह बाजारात उपलब्ध आहे.

Hyundai Grand i10 Nios

Hyundai कंपनीच्या कारला देखील भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीची Grand i10 Nios ही कार देखील सीएनजी मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. तसेच स्वस्त सीएनजी कारपैकी ही एक कार आहे.

या कारमध्ये कंपनीकडून 1.2-लिटर, 4-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे 83 PS ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार ३ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मॅग्ना, स्पोर्ट्झ आणि अस्टा. मॅग्ना वेरिएंट अशी त्यांची नवे आहे.

मॅग्ना या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.16 लाख आहे. तसेच Sportz ची एक्स शोरूम किंमत 7.70 लाख रुपये आहे आणि Asta व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 8.45 लाख रुपये आहे.

Tata Tigor iCNG

टाटा कंपनीकडून ग्राहकांना आणखी एक सीएनजी कार बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. Tata Tigor iCNG या कारला देखील प्रचंड मागणी आहे. या कारची किंमत किंमत असल्याने ग्राहकांना चांगलीच आकर्षित करत आहे.

या कारमध्ये कंपनीकडून 1.2-लिटर इंजिन देण्यात येत आहे. तसेच हे इंजिन 86 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. टाटा टिगोर XM, XZ आणि XZ Plus या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.40 लाख रुपये आहे.

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

1 thought on “Top 5 CNG Cars Under 6 Lakh | शानदार मायलेजच्या भारतातील Top 5 CNG कार, किंमत 6 लाखांपासून सुरू जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment