Today IMD Alert : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील ४ दिवसांत देशासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या
सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसून येत आहे.
नागरिकांना कधी उन्हाच्या झळा तर कधी थंडीचा कडाका जाणवत आहेत. ४ ते ५ दिवसांपूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. मात्र, त्यानंतर ढगाळ वातावरण निवळलं होतं.मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात
पावसाचं वातावरण निर्माण होत आहे. पुढील ४ दिवसांत मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी वातावरण कोरडं राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
📝 हे पण वाचा :- 200 किमीची रेंज देणारी ही स्कूटर आताच घरी घेऊन या ! स्कूटरची किंमत ही 1 लाखांपेक्षा कमी, पहा फीचर्स !
Today IMD Alert
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकले जाईल आणि गुरुवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर दबाव वाढेल.
त्यामुळे भारतात १४ नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालू शकतो. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. याशिवाय राजधानी दिल्ली-एनसीआर परिसर आणि अंदमान आणि निकोबार बेटावर पावसाची शक्यता आहे.