Sonchafa Farming :- चाफ्याचे कलम जातिवंत मातृवृक्षावर भेट कलम पद्धतीने केले जाते. यासाठी मूळरोप चाफ्याचेच वापरले जाते.अशी कलमे झाडावर तयार होण्यास 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागतो. ही कलमे झाडावर तयार झाली, की पावसाळ्याच्या सुरवातीस झाडावरून उतरवून ती नर्सरीमध्ये मोठ्या पॉलिथिन बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये जोपासना केली जाते. साधारणतः एक वर्षानंतर ही कलमे लागवडीस योग्य होतात. अशी कलमे लावताना त्याची पूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्वच चाफ्याच्या झाडांची पाने जवळपास एकसारखीच असल्याने त्यांना जातीनुसार ओळखण्याची सुविधा नाही. त्यामुळे कलमे खरेदी करताना मातृवृक्ष बाग पाहून त्यावरील फुले पाहून खात्रीच्या नर्सरीमधून कलमे खरेदी करावी. अन्यथा कलमे लावून मोठी झाल्यावर फार मोठे आर्थिक नुकसान होते.
Sonchafa Farming
पूर्वी कोणाच्या तरी परसदारी किंवा विस्तीर्ण देवालयाच्या बाजूला मोठे डेरेदार चाफ्याचे वृक्ष असत. असे मोठे वृक्ष पावसाळ्यात श्रावण महिन्यामध्ये फुलांनी बहरून येतात. त्याचा तो मंद सुगंध आला, की मन मोहून जाते. परंतु याच कालावधीमध्ये पाऊस बऱ्यापैकी असल्याने मोठ्या वृक्षावरील फुले काढणे हे काम फारच कष्टप्रद असते.
हा फॅन लावला तर विसरुन जाल AC-कूलर, यातील टॅक्नॉलॉजीमुळे भर उन्हात राहाल कूल-कूल
जमीन
सोनचाफा लागवड करताना पाण्याचा निचरा उत्तमप्रकारे होणारी जमीन हवी. तसेच सूर्यप्रकाश भरपूर हवा. इतर झाडांची सावली असल्यास सूर्यप्रकाशाकरिता ही झाडे उंच वाढतात. नंतर फुले काढणे अवघड होते. पाण्याचा निचरा होणारी कोणतीही जमीन, कोणतेही हवामान या झाडांना मानवते. या झाडाचा नैसर्गिक आढळ उष्ण दमट हवामानात असतो. त्यामुळे जास्त पाऊस व आर्द्रतेच्या परिसरात याची वाढ चांगली होते.
लागवडीचा काळ
पाण्याची बारमाही सोय असल्यास कोणत्याही हंगामामध्ये लागवड करता येते. कलम लावताना खड्डा 60 सेंमी द 60 सेंमी. द 60 सेंमी, असा खणून त्यामध्ये कुजलेले कंपोस्ट खत, गांडूळ खत व शेणखताने अर्धा भरावा. दोन झाडांमधील अंतर 3 मीटर व दोन ओळींमधील अंतर 3 मीटर ठेवावे. कलमाचा डबा अथवा पॉलिथिन बॅग हलकेच काढून मुळांना इजा न करता कलम लावावे.
खते व पाणी व्यवस्थापन
एक वर्षानंतर या कलमांना कळ्या येऊन फुले येऊ लागतात. सुरवातीस हे प्रमाण कमी जास्त असते. दोन वर्षांनंतर झाडांची वाढ जोमदार झाल्यावर प्रत्येक झाडाला सरासरी 15 ते 20 फुले येतातच. फुले येण्याचा कमी जास्त काळ वगळता वर्षातून 180 दिवस फुले मिळतात. तीन वर्षानंतर झाडे चांगलीच जोमाने वाढून फुलांचे प्रमाण वाढते. झाडे अस्ताव्यस्त वाढून दाट होऊ नये यासाठी त्यांची छाटणी करून झाडे लहान ठेवता येतात. यामुळे फुले काढणे सोयीचे होते.
फुलांची काढणी
सकाळी लवकर फुले काढून ती जवळच्या बाजारामध्ये 3-4 तासातच पाठवावी. उन्हाने व धक्क्याने हे नाजूक फूल कोमेजते. यामुळे काढणी व विक्री या गोष्टी त्वरेने होणे महत्त्वाचे आहे. अशा फुलांना व्यापाऱ्यांकडून शेकडा 30 ते 40 रुपये दर मिळतो. सणासुदीच्या काळामध्ये यापेक्षा जास्त दर मिळतो. मेहनत व मशागतीचा खर्च वजा जाता हेक्टरी वार्षिक एक लाख रुपये तरी उत्पादन मिळते.
📢 तुमच्या घरात फिरणाऱ्या पालीने तुम्ही हैराण झाले आहे का ? हा उपाय करा… आता नाही दिसणार पाल :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा