मृदा आरोग्य कार्डद्वारे शेतकऱ्यांना साठी सरकारने आणलंय Soil हेल्थ कार्ड; जाणून घ्या ,मृदा हेल्थ कार्डचे फायदे !| Soil Health Card 2024

Soil Health Card 2024 :- मृदा आरोग्य कार्डद्वारे (Soil Health Card) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळते तसेच पिकांमध्ये संतुलित खत आणि खतांचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाते. यामुळे पिकांच्या दर्जेदार वाढीसह उत्पादनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा सरकारने केला आहे.

सॉईल हेल्थ कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात, सिंचन क्षेत्रातील 2.5 हेक्टर यूनिट क्षेत्रातून नमुना घेण्यात आला आणि बिगर सिंचन क्षेत्रातील 10 हेक्टर क्षेत्रातून एक नमुना घेण्यात आला.

सन 2019-20 पासून निवडलेले नमुने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. गावातील शेतातील मातीचे नमुने घेतले जात आहेत.

Table of Contents

Soil Health Card 2024

  • नमुना घेण्यापूर्वी शेतात घेतलेल्या पिकांची वाढ सारखीच आहे की नाही याची पडताळी करावी
  • तर पिकाची वाढीसाठी एकसमान खतांचा वापर केला आहे की नाही याची माहिती घ्यावी
  • जर जमीन सपाट असेल तर अशा स्थितीत संपूर्ण शेतातून प्रातिनिधिक नमुना घ्यावा.

माती आरोग्य कार्ड नमुना 

सध्या, भारत सरकारने विकसित केलेल्या सॉइल हेल्थ कार्ड ॲपद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी करून कृषी पर्यवेक्षकांद्वारा मातीचे नमुने गोळा करण्याचे काम ऑनलाइन केले जाते.

लॅबद्वारा प्राप्त नमुन्यांचे विश्लेषण करून आणि सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलवर चाचणी निकाल प्रविष्ट करून कार्ड तयार केले जातात.

हे कार्ड शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षका मार्फत उपलब्ध करून दिली जातात. जर शेतकऱ्यांना कार्ड मिळालेले नसतील तर ते भारत सरकारच्या सॉईल हेल्थ कार्ड पोर्टलवर लॉग इन करून त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून मृदा आरोग्य कार्ड मिळवू शकतात.

📢हि माहिती वाचा :- अरे बापरे आता या पोस्टाच्या योजनेतून दरमहा मिळणार 9,250 रुपये फक्त असे उघडा खाते !

Leave a Comment