Sharad Pawar Gai Gotha Best | गाय/म्हैस, शेळी शेड,कुकुटपालन शेड 100% अनुदान योजना सुरु GR आला 1

Sharad Pawar Gai Gotha Best | गाय/म्हैस, शेळी शेड,कुकुटपालन शेड 100% अनुदान योजना सुरु GR आला 1

Sharad Pawar Gai Gotha

Sharad Pawar Gai Gotha :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना सुरु केली आहे. शेतकरी बांधवांना (गाय/म्हैस गोठा अनुदान) व त्याचबरोबर (शेळी पालन शेड अनुदान कुकुट पालन शेड अनुदान)

त्याचबरोबर भू-संजीवनी कंपोस्ट अनुदान योजना. या अंतर्गत आपल्याला 100% अनुदान देण्यात येते. तर या योजनेची संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. तसेच शासनाचा शासन निर्णय व या योजनेसंबंधीतील अर्ज या लेखात पहाणार आहोत. त्यासाठी संपूर्ण वाचायचा आहे.

Sharad Pawar Gai Gotha

ग्रामसमृद्धी योजना :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून सदर योजना. राज्य योजना म्हणुन राबविण्यात येत आहे. या योजनेत कोणती कामे घेण्यात येतात म्हणजे कोणते लाभ देण्यात येतात.
 • गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे 
 • शेळी पालन शेड बांधणे 
 • कुक्कुटपालन शेड बांधणे 
 • भू-संजीवणी नाडेप कंपोस्टींग 
logo

हेही वाचा; कापूस लागवड कशी करावी नवीन सुधारित बियाणे पहा लगेच माहिती 

गाय/म्हैस पालन गोठा अनुदान योजना 

 • गाय गोठा योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुदान किती आहे
 • गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे साठी-
 • 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा – रु.77188/-. 
 • 6 पेक्षा जास्त गुरे असतील तर दोन गोठेसाठी – रु. 154376/-
 • 12 पेक्षा जास्त गुरे असतील तर तीन गोठ्यांसाठी- रु. 231564/-.

शेळी पालन शेड अनुदान योजना 

 • 2 ते 10 शेळ्यांसाठी एक शेड – रु.49284/-. 
 • 20 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर दोन शेडसाठी – रु. 98568/-
 • 30 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर तीन शेडसाठी- रु. 147852/-
कुक्कुटपालन शेड अनुदान योजना 
 • शेड बांधणे साठी- 100 पक्ष्यांसाठी एक शेड रु. 49760/-
 • 150पेक्षा जास्त पक्षांसाठी दोन शेड साठी- रु. 99520/-
 • भू-संजीवणी नाडेप अनुदान योजना
 • नाडेप कंपोस्टींग यूनिट बांधणे साठी- रु.10537/-
logo

हेही वाचा; भुईमुग लागवड सम्पूर्ण व्यवस्थापन येथे जाणून घ्या लगेच

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ कुणाला मिळेल ? 

मनरेगाच्या निकषानुसार स्वतःची जमीन तसेच वैयक्तीक लाभाच्या निकषा नुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी. तसेच शेळीपालन शेड आणि कुक्कुट पालन शेड साठी भुमीहीन कुटुंबांना सुद्धा लाभ देण्यात येईल.

गाय/म्हैस गोठा बांधकाम किती आकाराचे असावे
 • गाय व म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधणे साठी 6 जनावरां करीता 26.95 चौ.मी. गोठा लांबी- 7.7 मी. आणि रुंदी- 3.5 मी. गव्हाण- 7.7 मी x 0.2 मी. X 0.65 मी. तसेच 250 ली.क्षमतेचे मुत्रसंचय टाके आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 ली.क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात यावी.

logo

हेही वाचा: उस लागवड कशी करावी व संपूर्ण व्यवस्थापन जाणून घ्या लगेच येथे 

शेळी शेड बांधकाम किती आकाराचे असावे

 शेड बांधणेसाठी 10 शेळ्यांसाठी 7.50 चौ.मी. ( लांबी- 3.75 मी, रुंदी- 2 मी.) आणि कुक्कुटपालन शेड बांधणे साठी- 100 पक्षांकरीता 7.50 चौ.मी. (लांबी- 3.75 मी, रुंदी- 2 मी.) . भू-संजीवणी नाडेप कंपोस्टींग साठी-जमिनी वरील बांधकाम 3.6 मी. x 1.5 मी. x 0.9 मी. अर्ज कुठे करावा- ग्रामपंचायती मध्ये.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्ज कसा करावा ? 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेचा शासन निर्णय व या योजनेसंदर्भातील अर्ज करण्यासाठी अर्ज चा नमुना. आपल्याला खाली देण्यात आलेला आहे. तर तो आपण डाऊनलोड करू शकता. आणि अर्ज कसा करावा व त्या संदर्भातील शासन निर्णय संपूर्ण माहिती दिली आहे.

logo

➡➡ येथे पहा शासन निर्णय व अर्ज नमुना ⬅⬅


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सीताफळ फळबाग लागवड अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!