SBI New FD Plan :- सर्वात लोकप्रिय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI च्या सर्वच योजनांवर ग्राहकांचा खूप विश्वास आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार बँकेच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाची फिक्स्ड डिपॉझिट ही अशीच एक योजना आहे.
SBI New FD Plan
ज्यातून गुंतवणूकदारांना कर बचतीसोबतच मोठा नफा मिळवता येत आहे. एसबीआय एफडीवर सर्वात जास्त परतावा देत आहे. समजा तुम्ही या एफडीमध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला तब्ब्ल 10 लाख रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजे तुमचे या योजनेमध्ये दुप्पट पैसे होतील. जाणून घ्या सविस्तर.
जाणून घ्या व्याजदर
या बँकेच्या वेबसाइटनुसार, ज्येष्ठ नागरिकांना यात अतिरिक्त 0.50 टक्के व्याजदर मिळेल. पाच ते दहा वर्षांच्या एफडीसाठी, ही योजना 7.50 टक्के व्याज दर देते.
इतकेच नाही तर तुम्ही ऑनलाईन, योनो अॅपद्वारे किंवा शाखेला प्रत्यक्ष भेट देऊन FD घेता येईल. यावर तुम्हाला FD वर मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक आधारावर व्याज मिळेल.
💻 हेही वाचा :- आता कुणाचेही लोकेशन फक्त मोबाईल नंबर टाकून पहा, पण कसे पहा खास हा व्हिडीओ !
हे लक्षात ठेवा की TDS कापल्यानंतर तुम्हाला FD वर व्याज मिळू शकेल. स्टँडर्ड फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज दर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.50 टक्के ते 7.50 टक्के इतके दिले जात आहेत.
10 वर्षात मिळेल डबल परतावा
या FD योजनेत गुंतवणूक केली तर तुमचे पैसे 10 वर्षामध्ये डबल होतील. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दहा वर्षांनी 10 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळेल. बँक 10 वर्षांच्या कालावधीसाठी स्टँडर्ड एफडीवर 6.5 टक्के व्याज दर ऑफर करत आहे त्यामुळे त्या कालावधीत तुम्हाला एकूण 5 लाख रुपये व्याज मिळू शकेल.