Punjab Dakh Hawaman :- कसा राहील यंदाचा मान्सून ? एलनिनो सोबतच त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत देखील मोठी माहिती यावेळी दिली आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा 8 जूनला मान्सूनचं राज्यात आगमन होणार आहे.
मात्र यावेळी फक्त मान्सूनचे आगमन होईल. सर्वत्र या कालावधीमध्ये पाऊस पडणार नाही. 22 जून पर्यंत मात्र सर्वत्र महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. 22 जूनला उसाची तीव्रता वाढेल. 27 ते 28 जून पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या जातील.
Punjab Dakh Hawaman
28 जून पर्यंत राज्यात बहुतांशी भागात सोयाबीनची पेरणी होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं. यासोबतच जून पेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस राहणार आहे आणि जुलै पेक्षा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अधिकचा पाऊस राहील असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केल आहे.
याशिवाय त्यांनी यावर्षी 26 ऑक्टोबर पासून थंडी सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेर थंडीला यावर्षी सुरुवात होणार आहे. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात देखील पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
हवामान अंदाज आजचे
दिवाळीत यंदाही पाऊस पडणार असल्याच मोठ भाकीत डक यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आल आहे. निश्चितच डख यांचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी समाधानाचा आहे. यामुळे आता अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दुष्काळ पडतो की डखं यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार 2022 प्रमाणेच याही वर्षी चांगला पाऊस पडतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.