Punjab Dakh Havaman Andaj Best | आताची सर्वात मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी होणार, पंजाब डख यांचा इशारा 1

Punjab Dakh Havaman Andaj Best | आताची सर्वात मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी होणार, पंजाब डख यांचा इशारा 1

Punjab Dakh Havaman Andaj

Punjab Dakh Havaman Andaj :- राज्यात पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, काल राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी बघायला मिळाली आहे.

राजधानी मुंबई समवेतच ठाणे मध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. रात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. या शिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे.

Punjab Dakh Havaman Andaj

Punjab Dakh Havaman Andaj

एवढेच नाही तर भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार, आज देखील राज्यात पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील अनेक विभागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून भारतीय हवामान विभागाने कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

तसेच भारतीय हवामान विभागाने उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार 12 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून राज्यातील अनेक विभागात पावसाचा जोर वाढणार आहे.

पंजाब डख हवामान अंदाज ?

12 सप्टेंबर पासून राजधानी मुंबई तसेच ठाणे आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार असून या विभागातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या शिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील घाट विभागात देखील जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असल्याने संबंधित भागातील नागरिकांना सतर्क राहणे गरजेचे आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज समोर आला आहे.

आजचा हवामान अंदाज पंजाब डख

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात जवळपास 22 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे. 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

या दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ मधील अकरा जिल्ह्यात पावसाची शक्‍यता. राहणार आहे. दरम्यान 16 सप्टेंबर पर्यंत राजधानी मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. याशिवाय 16 सप्टेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस कोसळणार आहे.

कुठे कसा असेल हवामान अंदाज

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे पंजाब रावांनी सांगितले आहे. तसेच राज्यातील नांदेड लातूर सोलापूर उस्मानाबाद औरंगाबाद हिंगोली अहमदनगर नाशिक या जिल्ह्यातही 14 सप्टेंबर पर्यंत पाऊस कोसळणार असल्याचे पंजाब राव यांनी नमूद केले आहे.

हवामान अंदाज आजचे लाईव्ह

निश्चितच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. मात्र सदर कालावधीत बरसणारा पाऊस हा भाग बदलत बरसणार आहे. अर्थातच, पंजाबराव यांनी वर्तवलेल्या या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याने जनजीवन विस्कळित होणार तसेच त्यामुळे शेतकरी पीकाला देखील मोठा फटका बसू शकतो.


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

error: Content is protected !!