Punjab Dakh Aajcha Andaj :- उद्यापासून पडणारा पाऊस हा उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील कायम राहणार आहे. अर्थातच कोकण वगळता जवळपास संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
निश्चितच राज्यात पुन्हा एकदा गारपीट होणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला असल्याने जर हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या काढणी योग्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
डख यांच्या मते मराठवाड्यात 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस आणि काही भागात गारपीट होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता राहणार आहे.
पंजाब डख यांचा अंदाज लाईव्ह; या भागात येणार महापूर, वाचा सविस्तर लाईव्ह अंदाज
Punjab Dakh Aajcha Andaj
पूर्व विदर्भात आज पासून ते 29 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भात 25 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे तसेच काही भागात गारपीट देखील होऊ शकते असे मत डख यांनी व्यक्त केले आहे.
खरं पाहता सध्या मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात हळद, कांदा, मका तसेच काही शेतकऱ्यांच्या गव्हाच्या पिकाची देखील काढणी सुरू आहे. अशातच हवामानात होणारा हा बदल आणि गारपीटीची शक्यता शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. पंजाबरावांनी वर्तवलेला हा अंदाज जर खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे होऊ शकते असं जाणकार नमूद करत आहेत.
📢 अवकाळीचे संकट; आता या दिवशी पडणार मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा शेतकऱ्यांना इशारा :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा