शेतकरासाठी विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ऑनलाइन नोदणी कशी करावी पहा सविस्तर माहिती | POCRA Navin Vihir Yojana

POCRA Navin Vihir Yojana :- मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत असून

भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत.

POCRA Navin Vihir Yojana

 • या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे
 • संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादनात वाढ करणे

अनुदानासाठी लाभार्थी निवडीच्या अटी आणि पात्रता 

 • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्पभूधारक शेतकर्‍यांना तसेच अनुसूचित जमाती/ जाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्य  
 • विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र हे 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • ज्या शेतकर्‍याकडे संरक्षित शेती सिंचनाची सोय नाही, अशा शेतकर्‍यांना लाभ देण्यात यावा. आधी या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार नाही.
 • लाभार्थी निवड करताना प्रास्ताविक नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्रोत यातील अंतर 500 मीटरपेक्षा जास्त असल्याची खात्री करावी.
 • महाराष्ट्र भूजल अधिनियम अधिनियम 2009 अनुसार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोता व्यतिरिक्त प्रास्ताविक विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरीचे अंतर 150 मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • गावातील अस्तित्वातील व प्रास्ताविक असे एकूण सिंचन विहिरींची संख्या लागवडी योग्य क्षेत्राच्या 8 विहिरी प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींसाठी स्थळ निश्चितीसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
 • अति शोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी घेण्यास मनाई असणार आहे.
 • नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता या कामांसाठी कमाल 1 वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.

अनुदान किती ? 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबवण्यात येणार्‍या नवीन पाणी साठवण निर्मिती म्हणजे नवीन विहिरीची निर्मिती या घटकांतर्गत 100 टक्के अनुदान दोन टप्प्यात देण्यात येईल.

पहिला टप्पा – विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोद कामावरील खर्च

दुसरा टप्पा – विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम

100 टक्के अनुदान रुपये 2.50 लाख अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे

7/12 उतारा

8-अ प्रमाणपत्र

या योजनेस पात्र आणि इच्छुक शेतकर्‍यांनी या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

📢हि माहिती वाचा :- ‘या’ प्रकारचे रोटावेटर ठरतील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत !

Leave a Comment