Pashusavardhan Vibhag Yojana | पशूपालकांना दिलासा ! आता जनावरांना मिळणार हक्काचा निवारा; मनेरगा अंतर्गत होणार बंदिस्त पशुपालन

Pashusavardhan Vibhag Yojana :-ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत मोठ्या प्रमाणात जोडव्यवसाय करतात. याला शेतीपूरक व्यवसाय (Buisness) असेही म्हंटले जाते. यामध्ये कुक्कुटपालन, पशुपालन, मत्स्यपालन, शेळीपालन या व्यवसायांचा समावेश होतो. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न भेटते. सरकार सुद्धा असे व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदाने व योजना जाहीर करून प्रोत्साहन देते.

Pashusavardhan Vibhag Yojana

मध्यंतरी सरकारने पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे ‘मनरेगा’त अभिसरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता पशुसंवर्धन विभागाच्या योजना ‘मनरेगा’द्वारे एकत्र राबविण्यात येणार आहेत. राज्यात पशुसंधर्वन विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात. (MGNREGA)

शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन

यामध्ये दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे, ठाणबंद पद्धतीने शेळी, मेंढी पालन व्यवसायासाठी मेंढ्याचे गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पालन व्यवसाय यांचा समावेश होतो. या योजनेमुळे अनेक अल्पभूधारक व दारिद्य्ररेषेखालील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन (Source of income ) मिळाले आहे.

बंदिस्त पशुपालन होत नाही

यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास व राहणीमान उंचावण्यास मदत होते. असा निष्कर्ष राज्य शासनाने ( State Government) काढला आहे. मात्र, या योजनेंतर्गत गाय, म्हैस, मेंढी- शेळी गटांचे वाटप केलेल्या लाभार्थ्याकडून बऱ्याचदा बंदिस्त पशुपालन होत नाही. यामुळे त्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नाही.

 

Falbag Lagwad Yojana 2023 Maharashtra

 फॅन लावला तर विसरुन जाल AC-कूलर, यातील टॅक्नॉलॉजीमुळे भर उन्हात राहाल कूल-कूल

जनावरांना पौष्टिक आहार मिळत नाही.

या जनावरांना बहुतेक ठिकाणी मोकळ्या रानात सोडले जाते. यामुळे त्यांना पौष्टिक आहार ( Diet for animals) मिळत नाही. तसेच जंताचा प्रादुर्भाव वाढून दुधाचे प्रमाणे कमी होते. याशिवाय दुधात आवश्यक फॅटसही नसल्याने दुधाला योग्य दर मिळत नाही. असे निष्कर्ष राज्य शासनाने काढले आहेत. बहुतेक वेळा शेळ्या- मेंढ्यांना चाऱ्यासाठी भटकंती केल्याने पौष्टिक आहार मिळत नाही.

बंदिस्त पशुपालन

यामुळे शेळ्या मेंढ्यांचे वजन योग्य प्रमाणात वाढत नाही आणि त्यांच्यात जंत प्रादुर्भाव वाढत आहे. म्हणून मनेरगा अंतर्गत आता बंदिस्त पशुपालन केले जाणार आहे. ‘मनेरगा’ मधून पशुसंवर्धनाच्या योजनेला गती देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या विविध सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

Falbag Lagwad Yojana 2023 Maharashtra

पंजाबरावांचा महत्वाचा अंदाज जारी, राज्यात 22,23,24 रोजी या भागात कोसळणार मुसळधार पहा हा नवीन अंदाज लाईव्ह व्हिडीओ सोबत 


📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार अतो का ? :- पहा कायदा

 

Leave a Comment