Panjabrao Dakh Havaman Andaj :- गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून राज्यात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे पावसाच्या अभावी खरिपाची पिके सुकून चालली आहेत.
त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. अशात आता राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
Panjabrao Dakh Havaman Andaj
राज्यात आज (दि. १७) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
हवामान अंदाज पंजाब डख
मान्सूनचा आस सध्या हिमालयाच्या पायथ्याशी असून पुढील ४८ ते ७२ तासांमध्ये दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. १८ ऑगस्ट रोजी बंगालचा उपसागर व लगतच्या
भागांमध्ये कमी दाबाचे पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. दि. १८ तारखेनंतर कोकण, मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे. दि. १८ व १९ नंतर विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पंजाब डख हवामान अंदाज
दि. १७ ऑगस्ट पासून पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण या भागात पाऊस जाणार आहे. म्हणून दि. २२ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस पडलेला दिसेल म्हणून ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे.
शेतकऱ्यांनी घाबरू नका या वर्षी देखील चांगला पाऊस पडणार आहे. पिके चांगली येणार आहेत. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, पूर्वेकडून पाऊस येणार आहे.
दि. १७ ते २२ पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यात सर्वदूर पडणार आहे. दि. २५ ऑगस्ट नंतर हे राज्यात पावसाचे वातावरण राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे.