Orange Picavaril Rogache Best | संत्रा पिकावरील रोगाचे व्यवस्थापन | संत्रा खत व्यवस्थापन 1 -

Orange Picavaril Rogache Best | संत्रा पिकावरील रोगाचे व्यवस्थापन | संत्रा खत व्यवस्थापन 1

Orange Picavaril Rogache

Orange Picavaril Rogache :- डिंक्‍या हा बुरशीजन्य रोग असून या रोगात झाडाच्या सालीतून डिंकासारखा पदार्थ ओघळताना दिसतो. झाडाच्या सालीचा रंग लालसर होऊन शेवटी काळपट होतो. रोगट लाल साल वाळून तिला उभ्या भेगा पडतात. या रोगाचा प्रसार संत्रा झाडाला ओलित करणाऱ्या वाहत्या पाण्यामुळे होतो.

Orange Picavaril Rogache
Orange Picavaril Rogache

Orange Picavaril Rogache

संत्रा पिकाला ठिबक सिंचनाने ओलित करावे.  ठिबक सिंचन पद्धत उपलब्ध नसल्यास संत्रा पिकाला डबल रिंग पद्धतीने पाणी द्यावे म्हणजे झाडाच्या बुंध्याभोवती दोन वर्तुळाकार आळे तयार करून त्यामधून बांगडी पद्धतीने पाणी द्यावे व संत्र्याच्या बुंध्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.

व्यवस्थापन योजना

संत्रा बागेत पावसाळ्यात जास्तीचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व जास्तीचे पाणी संत्रा बागेत साचले तर संत्रा झाडाच्या दोन ओळीत चर खोदून पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी.

पाय कुज व मूळकूज

या रोगात झाडाच्या कलम युतीचा भाग जमिनीत गाडल्या गेल्यास तेथे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. नंतर हा प्रादुर्भाव खोडावर व मुळावर पसरतो. या रोगात झाडाची मुळे कुजतात व बुंधाची साल कुजते . पाने निस्तेज होऊन शिरा पिवळ्या पडतात व फळेही गळतात.फाद्या आणि खोडाचा भाग काळसर दिसू लागतो. मोठ्या मुळ्या कुजण्याचे प्रमाण हळूहळू दिसू लागते अशावेळी संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते.

व्यवस्थापन योजना

 या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा खोदून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात व व सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात. वर निर्देशित उपायोजना झाल्यानंतर डब्ल्यू पी हे संयुक्त बुरशीनाशक 25 ग्रॅम अधिक 50 मिली जवस तेल अधिक दहा लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या परिघामध्ये मिसळावे किंवा आळवणी करावी व मातीने वाफा झाकून घ्यावा


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!