Onion Price In Maharashtra :- महाराष्ट्रात तीनही हंगामात कांद्याची शेती केली जाते. खरीप हंगाम, लेट खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम अशा तीन हंगामात कांदा लागवड आपल्याकडे होते. मात्र या तीन पैकी रब्बी हंगामात सर्वाधिक शेती आपल्याकडे केली जाते.
याच कारण म्हणजे कांद्याला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे आणि अनेक भागात उन्हाळी कांद्याची रोपे खराब झाल्याने कांदा लागवडीत घट झाली आहे. गेल्या वर्षी पाच लाख 95 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांदा लागवड करण्यात आली होती.
Onion Price In Maharashtra
यंदा यामध्ये जवळपास 43 हजार हेक्टर क्षेत्राची घट नमूद करण्यात आली आहे. याशिवाय अवकाळी पावसामुळे अनेक गारपिटीमुळे राज्यातील बहुतांशी कांदा उत्पादक भागात उन्हाळी कांद्याचे नुकसान झाले आहे.
ढोबळमानाने अंदाज लावला तर जवळपास 73 हजार हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी कांदा या अवकाळी पावसाच्या आणि गारपीटीच्या भक्षस्थानी सापडला असून जवळपास या कांद्याचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. अर्थातच यंदा एक लाख 14 हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांदा उत्पादन कमी होणार आहे.
सोनचाफा फुलशेती कशी केली जाते? जाणून घ्या रोपांची निवड ते विक्री कुठे करायची याबाबत सविस्तर माहिती
उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन
महाराष्ट्रासह इतर प्रमुख कांदा उत्पादक राज्यात देखील उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटले आहे. एकंदरीत कांदा उत्पादन कमी झाले असल्याने उन्हाळी कांद्याच्या दरात तेजी राहू शकते असं चित्र तयार होत आहे. मात्र, यंदा उन्हाळी हंगामात उत्पादित झालेला कांदा अधिक काळ टिकणार नसल्याचे सांगितले जात आहे.
हरभरा बाजार भाव आजचा | आज या बाजार समितीत मिळतोय चक्क एवढा हरभरा 1
कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे
हवामानात होणाऱ्या बदलामुळे तसेच कांदा काढणीच्या वेळी बहुतांशी भागात झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे कांद्याची टिकवणक्षमता कमालीची कमी झाली आहे. उन्हाळी कांदा जवळपास डिसेंबर पर्यंत साठवला जातो काही शेतकरी तर जानेवारी महिन्यात उन्हाळी कांद्याची विक्री करतात.
📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार असतो का ? :- पहा कायदा