Monsoon Update 2023 Maharashtra :- राज्यात दोन महिने ठिकठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान केल्याचे पहायला मिळाले. तर गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या मोठा त्रास लोकांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे मान्सून कधी दाखल होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याबाबत हवामान विश्लेषक पंजाबराव डख यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पावसाळा सुरू होण्यास अवघा १० ते १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याचे सांगितले आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे २१ मे आणि २२ मे २०२३ ला अंदमान बेटावर मान्सूनने प्रगती केली असून २६ आणि २७ मे रोजी मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. त्यामुळे २२ मे, २३ मे आणि २४ मे रोजी राज्यात ठिकठिकाणी भाग बदलत मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावणार आहे. तर ३१ मे, १ जून आणि २ जून २०२३ रोजी पावसाळ्या सारखा जोरदार पाऊस होणार आहे.
Monsoon Update 2023 Maharashtra
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ८ जून रोजी होणार असल्याचा अंदाजही यावेळी पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल होत असून यंदाचा मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला अंदाज चुकला आहे.
फॅन लावला तर विसरुन जाल AC-कूलर, यातील टॅक्नॉलॉजीमुळे भर उन्हात राहाल कूल-कूल
पावसाळ्या सारखा जोरदार पाऊस होणार आहे
नैऋत्य मान्सूनचे वेळेआधीच म्हणजे १९ मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. यामुळे पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.
📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार अतो का ? :- पहा कायदा