मारुती जिमनी की महिंद्रा थार? कोणती कार सर्वात भारी? येथे वाचा संपूर्ण माहिती | Mahindra Thar Vs Maruti Jimny

Mahindra Thar Vs Maruti Jimny :- भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक (Mahindra Thar, Maruti Jimny) दमदार एसयूव्ही गाड्या आहेत. आजच्या काळात त्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. लूक, डिझाइन आणि फीचर्समुळे लोक एसयूव्हीला पसंती देतात. त्याचबरोबर थार आणि जिम्नी या दोघांचीही क्रेझ बाजारात जास्त आहे.

पण कोणाची क्रेझ एकमेकांपेक्षा जास्त आहे आणि कोणाची विक्री किती झाली हे पाहावे लागेल. कोणत्या कारणांमुळे लोकांना या गाड्या जास्त आवडत आहेत, तर चला तर मग जाणून घेऊया …

Mahindra Thar Vs Maruti Jimny

थारच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर ऑगस्टमध्ये थारची विक्री 5,951 युनिट्स होती. जिमनीची विक्री 3,104 युनिट्स होती.  सप्टेंबरबद्दल बोलायचे झाले तर, थारच्या एकूण 5,417 युनिट्सची विक्री झाली, तर जिमनीच्या 2,651 युनिट्सची विक्री झाली. ऑक्टोबरमध्ये थारने 5,593 आणि जिमनीने 1,852 युनिट्सची विक्री केली होती. 

मारुती सुझुकी जिम्नी 

मारुती जिमनीची  शोरूम किंमत 12.74 लाख ते 15.05 लाख रुपयांदरम्यान आहे. ही कार झेटा आणि अल्फा अशा एकूण दोन व्हेरियंटमध्ये येते. यात दोन ड्युअल टोन आणि 5 सिंगल टोन कलर शेड्स देखील देण्यात आले आहेत. या कारमध्ये पाच जण बसू शकतात. त्याची ग्राऊंड क्लिअरन्स 210 मिलिमीटर आहे. या कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 105 PS पॉवर आणि 134 nM टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स गियर बॉक्सचा पर्याय आहे.

महिंद्रा थार 

या कारची किंमत 10.98 लाख रुपयांपासून 16.94 लाख रुपयांपर्यंत आहे. यात इंजिनचे तीन पर्याय देण्यात आले आहेत. २ लीटर टर्बो पेट्रोल आहे. हे इंजिन 150 PS पॉवर आणि 320 nM पीक टॉर्क जनरेट करते. तर 1.5 लीटर डिझेल 118 पीएस टॉर्क आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. 2.2 लीटर डिझेल इंजिनमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

तरुणांमध्ये दोन्ही गाड्यांची क्रेझ

सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात कारची क्रेझ आहे. त्यात Mahindra Thar आणि Maruti Jimny या दोन्ही  गाड्या तरुणांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या आहे. दिसायला भरदस्त आणि चालवायलाही चांगल्या असल्याने सगळ्यांनी या कारवर नजर खिळून राहते. लूकसाठी या कारची सगळ्यात जास्त विक्री होत असल्याची देखील माहिती आहे. 

📝 हे पण वाचा :- हिरोची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आली, रेंज असेल 250 किमी, जबरदस्त लुक, फीचर्स किंमत पहा व तात्काळ करा खरेदी हा चान्स सोडू नका !

Hello Everyone,my name is bajrang patil Aurangabad, Maharashtra i am the Writer and Founder of this blog and share all information Related Education, Gov Recruitment, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.

Leave a Comment