या दिवशी होणार महिंद्रा बोलेरो CNG लाँच ,काय असेल किंमत मायलेज   वाचा माहिती. | Mahindra Bolero Pikup CNG

Mahindra Bolero Pikup CNG :- शेतकऱ्यांना शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गरज पडते. अर्थात काही शेतकरी शेतीमध्ये मशागतीसाठी ट्रॅक्टर तर शेतमाल वाहतुकीसाठी पीकअप खरेदी करण्यास पसंती देतात. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांकडे एकाच वेळी ट्रॅक्टर आणि पीकअप अशी दोन्ही वाहने पाहायला मिळतात. तर काही शेतकरी गोठा मोठा असेल.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे कुटुंब मोठे असेल तर एक भाऊ पिकअपवर भाजीपाला, टोमॅटो, कांदा वाहतुकीचा धंदा करतो. तर दुसरा शेती बघतो. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीकअपची नेहमीच क्रेझ असते.

त्यामुळे आता तुम्ही देखील पीकअप घेण्याचा विचार करत असाल. तर महिंद्राची सीएनजी बोलेरो पीकअप तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.

महिंद्राच्या सीएनजी बोलेरो पीकअपला कंपनीने 2523 सीसी क्षमतेचे 4 सिलेंडर दिले असून, एमएसआय 2500 सीएनजी, बीएस 6 इंजन दिले आहे. जे 67 एचपी पॉवरसह 178 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीने आपल्या बोलेरो पीकअपला 140 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. तसेच कंपनीकडून बोलेरोला 19 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देण्यात आले आहे.

Mahindra Bolero Pikup CNG

  • महिंद्रा बोलेरो सीएनजी पिकअपला कंपनीने पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे.
  • पुढील बाजूस 5 आणि मागील बाजूस 1 रिव्हर्स गिअर देण्यात आला आहे.
  • कंपनीने आपल्या या पीकअपला सिंगल प्लेट ड्राय क्लच दिला आहे.
  • महिंद्राची ही बोलेरो सीएनजी पिकअप ड्रायव्हरसह पुढे 1 सीटमध्ये उपलब्ध आहे.
  • कंपनीने या पीकअपला रिजिड लाइफ स्प्रिंग फ्रंट आणि रियर सस्पेंशनसह तयार केले आहे.
  • तसेच कंपनीने या पीकअपला पुढील बाजूस 7.00 R15 आणि मागील बाजूस 7.00 R15 आकारात टायर दिले आहे.
  • महिंद्राची सीएनजी बोलेरो पिकअप डेअरी, शेतमाल वाहतूक, पोल्ट्री अशा सर्व कामासाठी वापरली जाऊ शकते.

महिंद्राच्या बोलेरो पीकअपची शोरूम किमंत कंपनीने 9.03 लाख ते 9.10 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळा आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये या पीकअपची किंमत वेगवेगळी राहू शकते.

📢हि माहिती वाचा :- अरे बापरे आता या पोस्टाच्या योजनेतून दरमहा मिळणार 9,250 रुपये फक्त असे उघडा खाते !

Leave a Comment