Maharashtra Weather Forecast | पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील ‘या’ भागांना पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast  :- राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहेत. अशात आता हवामान खात्याकडून पुढच्या ३ दिवसांसाठी महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ३ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर इथं ६ एप्रिल (गुरुवार) रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Forecast

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! यंदा उन्हाळी कांदा तेजीत राहणार, ‘या’ बाजारात मुहूर्ताच्या कांद्याला मिळाला विक्रमी भाव

कधी आणि कुठे होणार अवकाळी पाऊस

दरम्यान, महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी ५ एप्रिल २०२३ पासून पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील ५ दिवस तीव्र हवामानाचा अंदाज अपेक्षित आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून देण्यात आली आहे.

 वाऱ्यांमुळे हवामानात बदल

महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचं मिलन झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कोनीय स्थितीमुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या भागात दमट वारे निर्माण झाले आहेत.

Maharashtra Weather Forecast

तुमच्या घरात फिरणाऱ्या पालीने तुम्ही हैराण झाले आहे का ? हा उपाय करा… आता नाही दिसणार पाल


📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार असतो का ? :- पहा कायदा 

Leave a Comment