Maharashtra rain Updates :- राज्यावर आज मॉन्सूनच्या तीन स्थिती कार्यरत असून यामुळे बहुतांश भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आणि मुंबईत सकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर विदर्भात देखील काही जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस आहे.
Maharashtra rain Updates
पुणे: राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यात पहाटे पासून तर विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस असल्याने बळीराजा सुखावला आहे.
तसेच कमी दाबाचा पट्टा हा १९ डिग्री उत्तरेकडे तयार झाला आहे. तसेच अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमी वारे तीव्र आहेत. त्यामुळे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
काही जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस
राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. तर राज्याच्या संपूर्ण विभागात विजांच्या कडकडाट आणि मेघवर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. ९ आणि १० तारखेनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच राज्यात ९ आणि १० तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
📑 हे पण वाचा :- महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना झोडपून काढणार, हवामान विभागाचा इशारा ! पहा लाईव्ह अपडेट !