लिंबाचे भाव ऐकून लोक चकित! तुमच्या शहरात 10 रुपयांत किती लिंबू मिळताय ? | Lemon Market Rate

Lemon Market Rate :- उन्हाळयाच्या दिवसांमध्ये लिंबाचे दर वाढणे हे शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. उन्हाळयात मागणी वाढताच लिंबाचे दर गगनाला भिडतात. हे ठरलेले सूत्र आहे.

मात्र अशातच सध्या लिंबाचे दर 350 टक्क्यांनी अधिक वाढल्याचे पाहायला मिळत आहेदेशातील लिंबू उत्पादक भागांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात उत्पादन न झाल्याने, बाजारात सध्या लिंबाचा तुटवडा जाणवत आहे. 

Lemon Market Rate

गेल्या तीस वर्षांपासून लिंबू विक्रीच्या व्यवसायात असलेल्या अकबर हुसैन या विक्रेत्याने म्हटले आहे की महिनाभरापूर्वी मोठ्या आकाराच्या प्रति 1000 लिंबूला घाऊक बाजारात 2,000 रुपये दर मिळत होता.

मात्र, सध्या घाऊक बाजारात त्याच आकाराच्या प्रति 1000 लिंबूला 7,000 रुपये इतका उच्चांकी दर मिळत आहे. अर्थात मागील महिनाभरात लिंबू दरात जवळपास 350 टक्क्यांनी अधिक वाढ नोंदवली गेली आहे.

एक लिंबू 5 ते 10 रुपयांना

उन्हाची तीव्रता वाढल्याने लिंबू सोडा आणि कोल्ड ड्रिंकसाठी लिंबू ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लिंबू व्यापारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार मार्चअखेर ही परिस्थिती असताना आणखी दोन महिन्यात लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सध्याच्या घडीला बाजारात मध्यम आकाराचा एक लिंबू 5 रुपये तर मोठ्या आकाराचा लिंबू 7 ते 10 रुपये दराने विक्री होत आहे.

📢ही माहिती वाचा :- ‘या’ प्रकारचे रोटावेटर ठरतील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत !

दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी अडचणीत

आंध्र प्रदेश लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील सर्व राज्यांमध्ये आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिसा या राज्यांचा क्रमांक लागतो.

मात्र, यंदा कर्नाटकसह अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने लिंबू उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे

📢ही माहिती वाचा :- शेतकरासाठी विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ऑनलाइन नोदणी कशी करावी पहा सविस्तर माहिती .

Leave a Comment