Imd Weather Alert Maharashtra Best | कमी दाबाचा पट्टा तयार राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा तर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा 1 -

Imd Weather Alert Maharashtra Best | कमी दाबाचा पट्टा तयार राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा तर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा 1

Imd Weather Alert Maharashtra

Imd Weather Alert Maharashtra :- दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळं पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.

Imd Weather Alert Maharashtra

Imd Weather Alert Maharashtra

पुढील 24 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य दिशेनं म्हणजेच दक्षिण छत्तीसगढच्या दिशेनं पुढे सरकणार आहे. दरम्यान, विदर्भात विजांच्या कडकडाटासह 11, 12 आणि 13 सप्टेंबर दरम्यान सर्वत्र पाऊस होणार आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संध्याकाळच्या सुमारास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर उद्यापासून पुढील तीन दिवस मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर  काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यातच आला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान अंदाज आजचा लाईव्ह

नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मच्छिमारांना देखील पुढील पाच दिवस अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर बघता, भारतीय हवामान विभागाकडून सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!