Hawaman Andaj Punjab Dakh | शेतकऱ्यांनो सावधान! अवकाळीचे संकट; आता या दिवशी पडणार मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा शेतकऱ्यांना इशारा

Hawaman Andaj Punjab Dakh :- या अंदाजात डख यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे करणे आवश्यक राहणार आहे.

डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज पासून 27 मार्च पर्यंत राज्यात पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. 25 मार्च, 26 मार्च आणि 27 मार्च रोजी पडणारा हा पाऊस फक्त पूर्व विदर्भातच राहणार आहे.

अक्कलकोट, देगलूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नागपूर या भागात या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज डख यांनी बांधला आहे.

Hawaman Andaj Punjab Dakh

तसेच राज्यात 28, 29 आणि 30 मार्च रोजी हवामान कोरडे राहणार आहे. यानंतर पुन्हा एकदा 31 मार्च आणि एक एप्रिल 2023 रोजी पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. यानंतर दोन एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे.

या कालावधीमध्ये मात्र शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घेणे आवश्यक राहणार आहे. कारण की, पाच एप्रिल नंतर राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार आहे. 5 एप्रिल पासून राज्यातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलेल.

Hawaman Andaj Punjab Dakh

एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! या तारखेला मुसळधार पाऊस पडणार पहा पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Weather Update

आणि पुन्हा एकदा राज्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे. 5 एप्रिल, 6 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या कालावधीमध्ये पडणारा

पाऊस हा राज्यात सर्वदूर पडणार असून मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दोन एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान शेतीची राहिलेली कामे पूर्ण करून घेणे गरजेचे राहणार आहे.


📢 राज्यात अवकाळीचं संकट कायम; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट, तुमचा जिल्हा ? :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment