Hawaman Andaj Aajcha Live Best | आज मुसळधार पावसाचा अंदाज तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 1 -

Hawaman Andaj Aajcha Live Best | आज मुसळधार पावसाचा अंदाज तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 1

Hawaman Andaj Aajcha Live

Hawaman Andaj Aajcha Live :- राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. याचबरोबर दिवसभर उन आणि संध्याकाळी जोरदार पाऊस अशीच परिस्थीती बनली आहे. आज (ता. 06) विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Hawaman Andaj Aajcha Live
Hawaman Andaj Aajcha Live

Hawaman Andaj Aajcha Live

पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे बुधवारपर्यंत (ता. 07) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारपासून (ता.08) राज्यात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सर्वाधिक 110 मिलिमीटरची नोंद झाली आहे. आज (ता. 06) विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, तळकोकणात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान, उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

Weather forecast for today

दरम्यान राज्यातील लातूर शहर आणि परिसरात तुफान पाऊस झाला. झालेल्या पावसाने शहरालगतच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचले आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर लातूरमध्ये पावसाचा हाहाकार घातला. या पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

परळीत झालेल्या मुसळधार पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. एक तास विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाल्यानं शेताततल्या उभी पिक माना टाकू लागली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.

Havaman Andaj

गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढतांना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे.


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!