महाराष्ट्रात मुसळधार पावसाला कधीपासून सुरुवात होणार ? पंजाबरावांचा अंदाज काय ?| Havaman Andaj Maharashtra 2024

Havaman Andaj Maharashtra 2024 :- मार्च महिना संपण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. आता एप्रिल महिना सुरू होणार आहे. दरम्यान एप्रिल महिन्याची सुरुवात झाली की लगेचच शेतकऱ्यांची नजर मानसूनकडे वळत असते. खरंतर गेल्यावर्षी मानसून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला.

यामुळे यंदाचा पावसाळा कसा राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. गेल्या पावसाळ्यावर एलनिनोचा प्रभाव पाहायला मिळाला होता.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या पावसाळ्यात फारसा पाऊस झाला नाही. राज्यातील काही भागात तर दुष्काळासारखी परिस्थिती आहे. यंदा मात्र तशी परिस्थिती तयार होणार नसल्याचा अंदाज काही जागतिक संघटनांनी व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी मात्र मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात आला नाही. गेल्या वेळी जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच आगमन झालं होत. मान्सूनच उशिराने आगमन झाले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

Havaman Andaj Maharashtra 2024

पण यंदा मात्र राज्यात मान्सून वेळेवर दाखल होणार असा अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी 2024 च्या पावसाळ्याचा पहिला अंदाज जारी केला आहे. यात ते म्हणालेत की, यंदा 21 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

📢हि माहिती वाचा :- ‘या’ प्रकारचे रोटावेटर ठरतील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत !

Leave a Comment