Havaman Andaj Live :- महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस होत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला.
दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला
Havaman Andaj Live
आहे. तसेच मराठवाड्यातही हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्याना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपिठ आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली.
तर राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीनेही तडाखा दिला आहे. आज (ता. 19) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
हवामान अंदाज आजचे
दक्षिण कर्नाटकपासून झारखंड पर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राजस्थानपासून उत्तर प्रदेश समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा, तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून राजस्थानपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा
सक्रिय आहे. राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या पोषक हवामान स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू आहे. आज (दि. 19) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात जोरदार वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
पंजाब डख यांचा हवामान अंदाज येथे टच करून पहा