Farmers Well Big News :- एकरभर क्षेत्रात विहिरीचे बांधकाम करणारा अवलिया शेतकरी बीड जिल्ह्यात आहे. या शेतकऱ्यालाही मागे टाकत जालना जिल्ह्यातील राणीउंचेगाव येथील शेतकऱ्याने अडीच एकर. क्षेत्रावर तब्बल 1 हजार 50 फुट गोलाकार आकाराचे शेततळे साकारले आहे. याची खोली 48 ते 52 फूट आहे.
Farmers Well Big News
शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी हे शेततळे साकारले आहे. यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. एढेच नव्हे तर यामध्ये मेणकापड (पन्नी) टाकण्यासाठी 15 ते 20 कामगारांना अडीच दिवसांचा कालावधी लागला. या ठिकाणी या शेतकऱ्याची तब्बल 21 एकर शेती असून सततचा दुष्काळ अन पाणी टंचाई याला कंटाळून हे शेततळे साकारले आहे.
असे आहे शेततळे
- 1050 फुट गोलकार शेततळे
- 2 कोटी लीटर पाणी साठवण क्षमता
- 48 ते 52 फुट तळ्याची खोली
- 8 हजार स्क्वेअर मीटर पन्नी
- 21 एकर शेतीला पुरवणार पाणी
- 5 महिन्यात 5 एचपीच्या मोटारने टाकले पाणी
- 22 लाख रूपयांचा केला खर्च
शेती विकसित करणार
दरम्यान, शेततळ्याचे काम सुरू असताना निघालेली माती तसेच मुरूम यातून 21 एकर शेताला फेरफटका मारता येईल, असा कच्चा रस्ता तयार केला आहे. कोरोना काळात ग्रामीण भागाचे महत्व जगाला कळाले आहे. हेच महत्व वाढवण्यासाठी उत्तम शेतीचे उदाहरण कसे असावे, यासाठी शेती विकसित करणार असल्याचे शेतकरी सुरडकर यांनी सांगितले.
सततच्या पाणी टंचाईला कंटाळून उपक्रम
शेततळ्याबाबत शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी सांगितले की, आमच्या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र, रब्बी हंगामात पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. उन्हाळ्यात तर जनावरांसाठी पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे एकदाच का होईणा पण कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यासाठी सर्वात मोठे शेततळे साकारले आहे.
कृषि विभागाचे सहकार्य नाही
नाविन्यपुर्ण उपक्रम राबवल्याची बोंबा बोंब करणाऱ्या कृषी विभागाची पोकरा योजना राणी उंचेगाव मध्ये लागू आहे. या योजनेतून शेतीतील काेणतीच बाब करता येत नाही असे नाही. मात्र, सुरडकर यांच्या शेतातील शेततळे हे अपवाद ठरले आहे. या तळ्याचे बांधकाम तसेच उभारणीसाठी कृषि विभागाकडून छदामही मिळाला नसल्याची दुर्देवी बाब ठरत आहे.
Source :- Divyamarathi

📢 गाय/म्हैस गोठा करिता १००% अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा
📢 या जातीच्या कोंबडी पालन करा देते 200 ते 300 अंडी पहा सविस्तर माहिती :- येथे पहा