farmer scheme in maharashtra :- शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या अनुदान योजना राबवल्या जात आहे, याची माहती घेऊया. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांनी शेती करणं सोपं होत असते. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
farmer scheme in maharashtra
देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही जातीची अट नाहीये. परंतु जर अर्जदार शेतकरी एससी एसटी जातीचा असेल, तर त्याला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
कृषी सिंचन योजना
शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली जातेय. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान दिले जाते.
अर्ज कुठे कराल
इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
लाभ प्रक्रिया
- फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला सुक्ष्म सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी पूर्व मंजुरी मिळेल.
- या मंजुरीनंतर शेतकरी अधिकृत विक्रेत्याकडून सुक्ष्म सिंचन प्रणाली विकत घेऊन शकतो.
- या सिंचन प्रणालीच्या पावत्या ३० दिवसाच्या आत ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड कराव्यात
📑 हे पण वाचा :- आनंदाची बातमी, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा साक्रिय या भागात ऑरेंज अलर्ट जारी, तुमच्या भागात कसा ? पहा हवामान विभागाचा अंदाज ?