Farmer Ration Card Benefits :- राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनेची पायाभरणी ही केली जाते. या योजनेच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असतो.
महाराष्ट्र राज्य शासनाने याच पार्श्वभूमीवर नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्रातील एकूण 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता दरवर्षी एक हजार आठशे रुपये देण्याची मोठी घोषणा केली आहे.
Farmer Ration Card Benefits
हे 1800 रुपये शेतकऱ्यांना रेशन ऐवजी दिले जाणार आहेत. राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता रेशन ऐवजी म्हणजेच धान्य ऐवजी थेट पैसे वितरित करण्याची ही योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून मासिक 150 रुपये प्रति व्यक्ती या पद्धतीने लाभ देऊ केला जाणार आहे. म्हणजेच एका व्यक्तीला वार्षिक एक हजार आठशे रुपयाचा लाभ मिळणार आहे.
रेशन कार्ड धारक
विशेष बाब अशी की हा लाभ शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट शासनाकडून मिळणार आहे. या योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील तीन लाख 79,882 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
खरं पाहता आत्तापर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता.
2023 चा मान्सून कसा राहणार? केव्हा होणार पावसाचं आगमन, कधी होणार पेरण्या?, पहा पंजाबरावांचा हा अंदाज
Farmer Ration Card
प्रतिमाह प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य, दोन रूपये प्रति किलो गहू व तीन रूपये प्रति किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु, या योजनेअंतर्गत मिळणारे धान्य काही कारणास्तव बंद झाले असल्याने आता थेट लाभार्थ्यांना पैसे वितरित करण्याची शासनाची योजना
आहे. याच्या माध्यमातून एपीएल रेशन कार्डधारक शेतकरी कुटुंबामध्ये जेवढे सदस्य राहणार आहेत त्यांना प्रतिव्यक्ती 150 रुपये मासिक मिळणार आहेत म्हणजेच प्रतिव्यक्ती 1800 रुपयाचा लाभ या ठिकाणी होणार आहे.
Ration Card Benefits
दरम्यान आता आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे याविषयी जाणून घेऊया. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ,
तसेच नागपूर विभागातील वर्धा, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली या जिल्ह्यात प्रति व्यक्ति एक हजार आठशे रुपये वार्षिक या पद्धतीने एपीएल रेशन कार्ड धारकांना लाभ दिला जाणार आहे.
📢 राज्यात अवकाळीचं संकट कायम; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट, तुमचा जिल्हा ? :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान :- येथे पहा