Falbag Lagwad Yojana 2023 Maharashtra | फळबाग लागवड करणे झाले सोप्पे ! सरकारने आणली ‘ही’ नवीन योजना

Falbag Lagwad Yojana 2023 Maharashtra :-शेती व शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. सध्या राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड (Fruit Farming) योजना राबविण्यात येत आहे. यामुळे फळबाग लागवडीला चालना मिळणार असून उत्पादनात वाढ होणार आहे.

Falbag Lagwad Yojana 2023 Maharashtra

फळबाग लागवड योजना

राज्यामध्ये फळबाग लागवडीच्या माध्यमातून लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ करणे, शाश्वत रोजगार निर्मिती करुन स्थानिक पातळीवर पूरक व्यवसायात वाढ करणे व फलोउत्पादन वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना सर्व जिल्ह्यांच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार असून याअंतर्गत जून ते मार्च या कालावधीत लागवड करण्यात येईल.

Falbag Lagwad Yojana 2023 Maharashtra

हा फॅन लावला तर विसरुन जाल AC-कूलर, यातील टॅक्नॉलॉजीमुळे भर उन्हात राहाल कूल-कूल

 

योजनेअंतर्गत या झाडांची करा लागवड

फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थीस शंभर टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर खालीक झाडांची लागवड करता येते.

१) फळझाडे
२) वृक्ष
३) फूलपिके
४)मसाला पिके
५) औषधी वनस्पती

झाडांची नावे

या योजने अंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, अंजीर कलमे, साग, गिरीपुष्प, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कडीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे. तसेच नवीन फळपिकांमध्ये द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, ॲव्होकॅडो, केळी (३वर्ष) या पिकांचा समावेश आहे. याशिवाय फूल पिकामध्ये गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा या पिकाचा समावेश आहे. मसाला पिकामध्ये लवंग, दालचिनी, जायफह, मिरी या पिकांचा समावेश आहे.

Falbag Lagwad Yojana 2023 Maharashtra

पंजाबरावांचा महत्वाचा अंदाज जारी, राज्यात 22,23,24 रोजी या भागात कोसळणार मुसळधार पहा हा नवीन अंदाज लाईव्ह व्हिडीओ सोबत 


📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार अतो का ? :- पहा कायदा

Leave a Comment