cotton disease prediction :- कपाशी पिकात काही वेळा पाने लाल होतात. काही शेतकरी याला लाल्या रोग म्हणतात. हे असं का होत. तर लाल्या हा रोग नसून ही एक विकृती आहे जी अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते. तर ही विकृती येण्याची कारणे काय आहेत याचीच माहिती आपण घेऊया.
cotton disease prediction
जर तुमच्या कपाशीला नत्र आणि मग्नेशिअम कमी पडत असेल तर कपाशीची पाने लाल होतात. याशिवाय जमिनीतील ओलावा कमी झाला किंवा जास्त पाऊस झाल्यानंतर पिकात पाणी साठून राहील्यानेही कपाशीची पाने लाल होतात. ही झाली लागवडीनंतर दिसणारी लक्षणे याशिवाय
कापशीची लागवड पाणथळ किंवा चिबड
जर तुम्ही असेल तर झाडांना अन्नद्रव्ये शोषण्यासाठी अडचण येते. चिबड जमिनीत पाण्यासोबत नत्राचाही निचरा होतो. त्यामुळे पिकाला नत्र कमी पडत आणि पाने लाल होतात. जमिनीतील पाण्याची कमतरता आणि रात्रीच्यावेळी जर तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा जर कमी असेल म्हणजे रात्रीच्यावेळी जर जास्त थंडी असेल तर झाडाच्या पानातील हरितद्रव्ये कमी होऊन अॅन्थोसायनीन हे लाल रंगद्रव्य तयार होतं. त्यामुळेही पाने लाल होतात.
कपाशीला आवश्यक असलेले
काही शेतकरी काय करतात कपाशीला आवश्यक असलेले नत्र, स्फुरद आणि पालाश युक्त खते टप्प्याटप्प्याने न देता एकदाच देतात. त्यामुळे पिकाला वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळेही पाने लाल होऊ शकतात. ही झाली कपाशीची पाने लाल होण्याची कारणे. आता या समस्येवर उपाय करायचे? ते सांगते.
पिकाला एकदाच सगळी खत न देता. गरजेनूसार म्हणजेच वाढीच्या टप्प्यानूसार खत द्या. केवळ रासायनिक खताचा भडिमार न करता शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत आणि जीवाणू खते सुद्धा वापरा त्यामुळे अपण जी खते देतो ती पिकाला लागू पडतात. तसच जमिनीची पाणी धरुन ठेवण्याचीही क्षमताही वाढते. अशाप्रकारे कपाशीत खताच योग्य जमिनीत लागवड करुन योग्य प्रमाणात खते दिल्यास कपाशीतील लाल्याचा प्रादुर्भाव टाळता येतो.
📑 हे पण वाचा :- आनंदाची बातमी, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा साक्रिय या भागात ऑरेंज अलर्ट जारी, तुमच्या भागात कसा ? पहा हवामान विभागाचा अंदाज ?