Cotton Bollworm Control :- यंदा कपाशीची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झाली. त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होतय. याशिवाय ढगाळ वातावरण असल्याने गुलाबी बोंड अळीचं संकट येण्याची शक्यता आहे. म्हणून कपाशी पिकात कामगंध सापळे लावण्याची हीच योग्य वेळ आहे.
Cotton Bollworm Control
त्यामुळे आतापासूनच निरीक्षण करुन गुलाबी बोंडअळीला रोखता येईल. हे कामगंध सापळे कसे लावायचे? याशिवाय बोंडअळीचं कमी खर्चात सोप्या पद्धतीनं नियंत्रण कसं करायच? याचीच माहिती घेऊया.
ज्याठिकाणी कपाशी ची वेळेवर लागवड झालीय अशा ठिकाणी कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत आहेत. अशा ठकाणी ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग फीरताना दिसताएत. यातील मादी पतंग कपाशीचे पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात. त्यामुळे पुढील काळात कपाशीत गुलाबी बोंडअळी वाढू शकते. या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जर टाळायचा असेल तर काय कराल?
गुलाबी बोंडअळीचे पतंग फीरताना दिसताएत
तर यावर सोपा उपाय म्हणजे कपाशीचं नीट निरीक्षण करुन गुलाबी बोंडअळी असलेल्या डोमकळ्या तोडा. या डोमकळ्या जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट करा. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्टरी ५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावा. जर जास्त प्रमाणात पतंग असतील तर काय करायच? सोपयं ….यासाठी आपल्याला सापळ्याची एकरी संख्या वाढवायचीय म्हणजे एक एकर क्षेत्रात ८ ते १० कामगंध सापळे लावाचेत.
बोंडअळी असलेल्या डोमकळ्या तोडा
बोंडअळीचं जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याची सोपी पद्धत म्हणजे ट्रायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटक. हे गांधीलमाशीसारखे परोपजीवी कीटक बोंडअळ्या फस्त करतात. म्हणून ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाचे ट्रायकोकार्ड एकरी २-३ या प्रमाणात लावा.
💻 हेही वाचा :- आता कुणाचेही लोकेशन फक्त मोबाईल नंबर टाकून पहा, पण कसे पहा खास हा व्हिडीओ !
परोपजीवी कीटक बोंडअळ्या फस्त करतात
लक्षात ठेवा हे ट्रायकोकार्ड पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावायचेत. ट्रायकोकार्ड शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी १० दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची नाहीए. कारण किटकनाशकामुळे ट्रायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटकही नष्ट होतात. हे ट्रायकोकार्ड तुम्हाला आपल्या विभागाच्या कृषी विद्यापीठात मिळू शकतील.