Birsa Munda Yojana Maharashtra Best | नवीन विहीर, जुनी विहीर, बोरवेल, मोटर पंप 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरू लगेच आपला अर्ज करा 1 -

Birsa Munda Yojana Maharashtra Best | नवीन विहीर, जुनी विहीर, बोरवेल, मोटर पंप 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरू लगेच आपला अर्ज करा 1

Birsa Munda Yojana Maharashtra
Birsa Munda Yojana Maharashtra :-नमस्कार सर्वांना. आजच या लेखांमध्ये महत्त्वपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी विविध योजना या 100% अनुदानावरती राबविण्यात येत असतात. आणि यामध्ये नवीन विहीर अनुदान योजना, जुनी विहीर दुरुस्ती योजना, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंपसंच, डिझेल त्याचबरोबर मोटर पंप, पीव्हीसी पाईप यासाठी अनुदान दिलं जातं. यासाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टल वरती केले जातात. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे. यासाठी हा लेख संपूर्ण वाचा, (Birsa Munda Yojana Maharashtra) आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना- ऊद्देश-  अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकरी यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवन मान उंचावणे.

Birsa Munda Yojana Maharashtra

 1. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी यांना देण्यात येणारे अनुदान-
 2. नविन विहिर- रु.250000/-
 3. जुनी विहिर दुरुस्ती- रु. 50000/-
 4. इनवेल बोअरिंग- रु.20000/-
 5. विज जोडणी आकार- रु.10000/-
 6. शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरिकरण- रु.100000/-
 7. सूक्ष्म सिंचन संच- ठिबक सिंचन- रु.50000/-, तुषार सिंचन- रु. 25000/-
 8. परसबाग- रु. 500/-
 9. पंप संच (डीझेल/विद्युत)- रु.20000/- (10 एचपी क्षमते पर्यंतच्या पंप करिता)
 10. पिव्हिसी/एचडीपीई पाइप- रु.30000/-

Navin vihir anudan yojana

सदर योजने अंतर्गत वरिल 9 बाबींचा समावेश असुन लाभ पैकेज स्वरुपात देण्यात येइल. खालील 3 पैकी कोणत्याही एकाच पैकेज चा लाभ लाभार्थिस देय आहे.
 
 • नविन विहिर पैकेज- नविन विहिर, विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, परसबाग व आवश्यक्तेनुसार इनवेल बोअरींग.
 • जुनी विहिर दुरुस्ती पैकेज- जुनी विहिर दुरुस्ती, विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, परसबाग व आवश्यक्तेनुसार इनवेल बोअरींग.
 • शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरी करण- शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरी करण,विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, परसबाग.
  ज्या शेतकरी यांनी यापूर्वीच योजनेतून/स्वखर्चाने विहिर घेतली असेल त्यांना विज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंप संच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, परसबाग यासाठी अनुदान अनुज्ञेय आहे.
 • वरिल घटकां पैकी काही घटक शेतकरी यांचे कडे  असतील तर उर्वरित आवश्यक घटकां चा लाभ घेण्यासाठी खालील घट कांची निवड करावी- वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन, पंपसंच, पिव्हिसी/एच डी पी ई पाईप, परसबाग.

Vihir Anudan Yojana  पुर्वसंमती

 1. लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
 2. शेतकरी यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.150000 पेक्षा जास्त नसावे.
 3. नविन विहिरिचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी यांचे कडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
 4. तसेच यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नविन विहिर चा लाभ घेतलेला नसावा.
 5. लाभर्थ्याच्या 7/12 वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहिर अस्ल्यास नविन विहिर लाभ घेता येणार नाही.
 6. नविन विहिर घ्यावयाच्या स्थलापासून 500 फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहिर नसावी.
 7. नविन विहिरी व्यतिरीक्त अन्य बाबींचा लाभ घेण्यासठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
 8. 3.0.40 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास
 9. व त्यांची जमीन 0.40 हे.इतकी होत अस्ल्यास त्यांनीकरार लिहुन दिल्यास त्यांना योजनेचा लाभ देय आहे.
 10. 6 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. मात्र दारिद्र्य  रेशेखालील लाभार्थिना ही अट लागू नाही.
 11. परंपरागत वां निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वन पट्टे धारक शेतकरी यांना प्राधान्य.
बिरसा मुंडा योजना आवश्यक कागदपत्रे
 • 1) 7/12
 • 8अ
 • आधार कार्ड
 • तहसीलदार यांचेकडील उत्पन्नचा दाखला.
 • नविन विहिरीचे बाबतीत भूजल सर्वेक्षण व विकास
 • यंत्रणेकडील  पाणी उप्लब्ध्तेचा दाखला आवश्यक आहे.
 
बिरसा मुंडा योजना अर्ज कुठे करावा ?
अर्ज Mahadbt Farmer Portal  या संकेत स्थळावर ऑनलाईन करावा. नविन विहिर- पुर्वसम्मती व कार्यारम्भ आदेश- नविन विहिरी साठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कृषी अधिकारी पं.स.हे कर्यारम्भ आदेश देतील. त्यानंतर 30 दिवसाच्या आत काम सुरु करावे.
 
शेततळे अस्तरिकरण योजना
शेततळे अस्तरिकरण साठी 500 मायक्रॉन जाडी ची प्लास्टीक फिल्म रीइनफोर्सड एचडीपीई जिओ मेंबरेन फिल्म (IS:15351:2015 Type II) वापरावी. ठिबक सिंचन- प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतून 35 टक्के(रु.50000 मर्यादेत) अनुदान असे 90 टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहिल. तुषार सिंचन-  प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतून कमाल रु. 25000 अनुदान लाभार्थ्याला देय राहिल. पंप संच-  पुर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्याकाडून खरेदी करावी. पाईप-  पुर्व संमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत लाभार्थी यांनी त्यांच्या पसंती नुसार  आयएसआय मार्क पाईप खरेदी करावी. किमतीच्या 100 टक्के, कमाल रु.30000 अनुदान देय आहे. पिव्हिसी पाईप च्या बाबतीत उच्चतम अनुदान रु.70 प्रती मिटर आहे.  एच डी पी ई पाईप च्या बाबतीत उच्चतम अनुदान रु.100 प्रती मिटर आहे.  एच डी पी ई लैमिनेटेड पाईप च्या बाबतीत उच्चतम अनुदान रु.40 प्रती मिटर आहे.  अनुदान- देय अनुदान इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर द्वारे लाभार्थीचे आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येइल.
logo

येथे क्लिक करून मार्गदर्शक सुचना पहा लगेच 


📢 शेवगा लागवड कशी करावी  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ 50%अनुदान योजना सुरु : येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!