Bhuimug Lagwad Kashi Karavi Best | भुईमूग लागवड कशी करावी | पावसाळी भुईमुगाची माहिती 1

Bhuimug Lagwad Kashi Karavi Best | भुईमूग लागवड कशी करावी | पावसाळी भुईमुगाची माहिती 1

Bhuimug Lagwad Kashi Karavi

Bhuimug Lagwad Kashi Karavi : नमस्कार शेतकरी बधवांसाठी अत्यंत महत्वाची व फायदेशीर अशी माहिती आहे आहे ती म्हणजे भुईमूग लागवड कशी करावी तर देश भारतामध्ये सर्वच ठिकाणी हे भुईमूग पीक घेतले जाते कारण भुईमूग हे एक तेल बिया आहेत त्या मुळे भुईमूगा ला देश भारत भरपूर मागणी असते तर या पिकाची लागवड कशी करावी कोणते बियाणे वापरावे हे सर्व माहिती करून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा

Bhuimug Lagwad Kashi Karavi 

भुईमूग हे सर्वांत जुने तेलबिया पीक महाराष्ट्रात व देशात सर्वच भागांत प्रामुख्याने खरिपात घेतले जाते. मागील दोन दशकांपासून सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल आदी पर्याय उपलब्ध झाल्याने भुईमूग लागवडीसाठी शेतकरी फारसा उत्सुक नाही, तसेच मिळणारा बाजारभाव व मजुरांची कमतरता असल्याने या पिकाखालील क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. परंतु, भुईमूग हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा, तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की) सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळते. भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.

पावसाळी भुईमुगाची माहिती

भुईमुगाचे महत्त्व : भुईमुगाची खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे १००० किलो तर उन्हाळी हंगामात १४०० किलो प्रति हेक्‍टर आहे. खरिपातील उत्पादकता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. देशातील एकूण उत्पादनापैकी ८० टक्के तेलासाठी, १० टक्के प्रक्रिया करून खाणे व १० टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (२५ टक्के) आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्‍य आहे.

भुईमूग लागवड तंत्रज्ञान

जमीन :  भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

भुईमुग लागवडीसाठी हवमान कसे असावे :  हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील आहे. भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते.

भुईमूग लागवड पूर्व माश्यागत:  भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत हवी. त्यासाठी जमिनीची मशागत चांगली होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी १५ सें.मी. खोल नांगरट करून घ्यावी. कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीआधी ७.५ टन प्रतिहेक्‍टरी शेणखत मिसळावे. याप्रमाणात शेणखत वा कंपोस्ट खत शेतात पसरवून द्यावे. जेणेकरून कुळवणी केल्याने ते चांगले पसरले जाईल.

भुईमूग पेरणी विषयी माहिती :  खरिपात पेरणी जून-जुलै महिन्यांत मॉन्सून सुरू होण्याच्या वेळेवर अवलंबून असते. भुईमुगासाठी पेरणी जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी.

भुईमुगाबरोबर आंतरपिके कोणती :  भुईमुगापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्‍वती नसल्यास भुईमूग+तीळ (६ः२), भुईमूग + सूर्यफूल (६ः२), भुईमूग + कापूस (२ः१), भुईमूग + तूर (६ः२) या प्रमाणात पेरणी करून दोन्ही पिकांचे अधिक उत्पादन घेणे शक्‍य होते, तसेच भुईमूग फळबागांमध्ये आंतरपीक घेतल्यास फळबागेस फायदा होतो.

भुईमुग लागवडीसाठी बियाणे प्रमाण किती पाहिजे  :   पेरणीकरिता सुमारे १०० ते १२५ किलो प्रतिहेक्‍टरी बियाणे लागते. परंतु, बियाण्याचे प्रमाण ठरविताना पेरणीकरिता निवडलेला वाण, हेक्‍टरी रोपांची संख्या, बियाण्यांचे १०० दाण्यांचे वजन, उगवणक्षमता व पेरणी अंतर आदी बाबींचा विचार करावा. यासाठी एसबी ११, टीएजी २४ या उपट्या वाणांसाठी १०० किलो, तर फुले प्रगती, टीपीजी ४१, जेएल ५०१ या वाणांसाठी १२५ किलो बियाणे पुरते. निमपसऱ्या व पसऱ्या वाणांसाठी ८० ते ८५ किलो बियाणे वापरावे.

भुईमुग लागवडीसाठी सुधारित वाणे :  उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी भुईमुगाचे लेखातील तक्‍त्यात दिलेले सुधारित वाण वापरावे. सुधारित वाणांचे बियाणे पेरले तर उत्पादनात ३५-४० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे

भुईमुग लागवडीसाठी बीज प्रक्रिया : रोपावस्थेत उद्‌भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाची पाच ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी, तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व  पीएसबी या जीवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे.

भुईमुग लागवडीसाठी पेरणी अंतर :  सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. जेणेकरून हेक्‍टरी ३.३३ लाख इतकी रोपांची संख्या ठेवता येईल. टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची २५ टक्के बचत होते. पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढणे शक्‍य होऊन प्रतिहेक्‍टरी ३.३३ लाख रोपे मिळतात. पेरणी पाच सेंमी खोलवर करावी.

भुईमुग लागवडीसाठी पेरणी पद्धत :  भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येईल. सपाट वाफा पद्धत :  पेरणी सपाट वाफ्यावर करायची झाल्यास ३० सेंमी अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून वाफशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर ३० सेंम तर दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे व पाणी द्यावे. त्यानंतर ७-८ दिवसांनी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घ्याव्यात. इक्रिसॅट पद्धतीने लागवड ः या पद्धतीस रुंद वाफा पद्धत  म्हणतात.

Bhuimug Lagwad

भुईमूग पाणी व्यवस्थापन : खरीप भुईमुगासाठी ४० ते ५० सें.मी. तर उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते  ८० सेंमी पाणी लागते. परंतु प्लॅस्टिक आच्छादित तंत्रामुळे ४०-५० टक्के पाण्याची बचत होते. तुषार सिंचन पद्धत ही प्लॅस्टिक आच्छादन तंत्राने  घेतलेल्या भुईमुगासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. जी पीकवाढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच तुषार सिंचनाने समान पद्धतीने पाणी देता येते.

भुईमूग काढणी तंत्र  :  भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८-९ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणावे.

भुईमुगाचे उत्पादन :  सुधारित पद्धतीने भुईमुगाची पेरणी योग्य पद्धतीने संतुलित खतांचा  वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास  भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून हेक्‍टरी २०-२५ (खरीप), तर ३०-३५ (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच ४-५ टन कोरडा पाला मिळण्यास काहीच हरकत

  1. माहिती स्रोत :- agrowon

📢 सोयाबीन लागवड विषयी सविस्तर माहिती :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!