Aajcha Havaman Andaj Weather :- बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.
आज पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर खरीप हंगामातील पिकांना हा मोठा दिलासा असेल.
Aajcha Havaman Andaj Weather
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने पुनरागमन केलं आहे. शुक्रवारी मराठवाड्यासह
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आता शनिवारी देखील राज्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही
ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान खात्याने शनिवारी बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
📝 हे पण वाचा :- शानदार मायलेजच्या भारतातील Top 5 CNG कार, किंमत 6 लाखांपासून सुरू जाणून घ्या सविस्तर
मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे.