Aajcha Havaman Andaj Weather : हे चक्रीवादळ उद्या अर्थातच 18 नोव्हेंबर 2023 रोजी बांगलादेशच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा
अवकाळी पाऊस सुरू होणार कां असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही असे स्पष्ट केले आहे.
तसेच खुळे यांनी आता महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. खुळे यांनी रविवार अर्थातच 19 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात सर्व दूर थंडी जाणवणार असे सांगितले आहे.
Aajcha Havaman Andaj Weather
तसेच त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच थंडीला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
पण महाराष्ट्रात सर्वदूर 19 तारखे नंतर थंडीला सुरुवात होणार आहे.उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाची आणि त्यामुळे पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता असून याच्या प्रभावाखाली राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात आता 19 तारखेनंतर हळूहळू थंडीला सुरुवात होणार आहे. यामुळे गुलाबी थंडीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आता लवकरच थंडी अनुभवायला मिळणार आहे.
📝 हे पण वाचा :- आता फक्त 19 रुपयांत धावेल तब्बल 145 किलोमीटर ! किंमत फक्त एवढी पहा फीचर्स ! व आताच करा खरेदी !