Aajcha Havaman Andaj Live :- सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून राज्याच्या अनेक भागात थोडाफार का होईना पाऊस झाला आहे यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.
दरम्यान राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
Aajcha Havaman Andaj Live
पाऊस पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये जोरदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर विदर्भामध्ये पुढील तीन दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.
आज आणि उद्यासाठी विदर्भाच्या काही भागांना देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार असल्यासची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
आज कसा असेल पावसाचा अंदाज ?
सध्या पावसाला पोषक वातावरण होत असून मान्सून सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज पावसाचा जोर वाढणार असून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट
जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा कोकणात तुरळ ठिकाणी पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार
होत आहेत आणि या वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येईल.
📑 हे पण वाचा :- ई पीक पाहणी कशी करायची ?| ई पीक पाहणी व्हर्जन 2 | ई पीक पाहणी माहिती कशी भरावी पहा माहिती व्हिडीओ सोबत !
6 thoughts on “Aajcha Havaman Andaj Live | आनंदाची बातमी, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा साक्रिय या भागात ऑरेंज अलर्ट जारी, तुमच्या भागात कसा ? पहा हवामान विभागाचा अंदाज ?”