A New Technique of Banana Production Best | केळी उत्पादनाचे नवे तंत्र | केळी उत्पादन माहिती 1 -

A New Technique of Banana Production Best | केळी उत्पादनाचे नवे तंत्र | केळी उत्पादन माहिती 1

A New Technique of Banana Production

A New Technique of Banana Production :- महाराष्ट्रात उसाखालोखाल केळीचे क्षेत्र वाढत आहे. थोडासा चांगला बाजारभाव व तीन वर्ष पिकाची मिळणारी उत्पादकता यामुळे केळी पिकाकडे पाहण्याचा शेतकर्‍यांचा दृष्टिकोन बदललेला आहे; असे असले तरी बर्‍याचदा उसाच्या क्षेत्रात केळीचे उत्पादन घेताना जुन्या पद्धतीने केळीची लागवड केली तर उत्पादनामध्ये घट आल्याचे दिसून येते. नव्या तंत्राचा वापर केल्यास नक्कीच केळीचे उत्पादन वाढते.

A New Technique of Banana Production
A New Technique of Banana Production

A New Technique of Banana Production

जमिनीची सुपीकता हा घटक लक्षात घेतला तर चांगल्या निचर्‍याच्या काळ्या व भारी जमिनीतसुद्धा एकरी 35 ते 45 टनांपर्यंत केळीचे उत्पादन वाढवता येते. मात्र यासाठी केळीची लागवड करताना पहिले पीक निघाल्यानंतर माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षण अहवालानुसार सामू 7.5 ते आठ पर्यंत असावा. क्षारता एक डेसीसायमन प्रति मीटर पेक्षा कमी असावी. शिवाय 10 ते 15 टक्क्यापेक्षा कमी चुनखडीच्या जमिनीमध्ये केळीचे पीक घेता येते. केळी पिकास माती परीक्षण अहवालानुसार खतांचा वापर केल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

पाणी व्यवस्थापन 

माती प्रमाणेच पाण्याची बाजूही महत्त्वाची आहे. केळी पिकाला फार क्षारयुक्त पाण्यामुळे या पिकाची वाढ खुंटते. पानाच्या कडा करपतात. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवड करण्यापूर्वी पाण्याचा नमुना तपासून घ्यावा. त्यानंतरच केळी लागवडीसाठी हे पाणी योग्य आहे की नाही हे लक्षात येईल. त्यानंतर केळी लागवडीचा निर्णय घेतला पाहिजे.

जमिनीची मशागत 

लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी एकरी 35 ते 40 किलो ताग किंवा धैंचा जमिनीत पेरावा. दीड महिन्यात त्याची पूरेशी वाढ होते. त्यावेळी तो ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावा. त्यानंतर पंधरा दिवस जमीन तशीच ठेवून कल्टीवेटरच्या सहाय्याने सात फुट अंतरावर सर्‍या काढून घ्याव्यात.

केळी लागवडीची पूर्व तयारी

पाच फुट अंतरावर अर्धा फुट खड्डा घेवून प्रत्येक खड्ड्यात खालील मिश्रणाचा दीड किलो खत टाकावा. तत्पूर्वी एक टन कुजलेली मळी किंवा कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड पाचशे किलो, कोंबडी खत पाचशे किलो या सर्वांचे मिश्रणावर पाणी शिंडपडून आठ ते दहा दिवस झाकून ठेवावे. या मिश्रखतामध्ये पाच किलो अ‍ॅझिटोबॅक्टर व पाच किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू.

पाच किलो पालाश उपलब्ध करणारे जीवाणू मिसळून प्रत्येकी खड्ड्यात टाकावेत. पाच फुट अंतरावर अर्धा फुट खड्डा घेवून दीड किलो खत प्रत्येक खड्ड्यात टाकावे. माती व खत चांगले मिसळून खड्डा केळी रोप लागवडीसाठी तयार ठेवावा. त्यानंतर ठिबक सिंचन संच जोडून उपनळ्या अंथरूण दोन ते तीन दिवस पाणी सुरू ठेवावे. साधारण दररोज तीन ते चार तास पाणी सोडावे.


📢 नुकसान भरपाई अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!